आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार चंद्रकांत पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान लक्षवेधी मांडत, सातोड शिवारातील ३३ हेक्टर जमिनीवर अवैध उत्खनन झाल्याची तक्रार केली होती. लाखो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करून, ४०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जमिनीच्या मोजमापासाठी कोल्हापूर येथून अधिकाऱ्यांचे पथक आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलचे कर्मचारी व तलाठी यांनी शुक्रवारी, सलग चौथ्या दिवशीही मोजणी केली. सातोड शिवारातील शेती जमिनीवर अवैध उत्खनन केल्याच्या आरोपावरून, २ रोजी ई.टी.एस.च्या पथकाने क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारपासून मोजणीला सुरुवात झाली.
मोजणी करणाऱ्या पथकात कोल्हापूरचे एक अधिकारी व स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर चौरे, तलाठी पी.पी.डामाळे, पिंपरी अकराऊतचे कोतवाल कडू सोनवणे, तहसील कार्यालयाचे कर्मचारी उस्मान भाई व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिपाई आर.आर.शेख यांचा सहभाग आहे. अद्याप संपूर्ण क्षेत्राची मोजणी झालेली नाही. संपूर्ण शेताचे मोजमाप केल्यानंतरच उत्खननाची माहिती सांगता येईल, असे पिंपरी अकराऊतचे तलाठी प्रशांत डामाळे यांनी सांगितले. मोजणीनंतर प्रशासनाकडून अहवालात कोणती माहिती सादर केली जाते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.