आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील विविध कारणाने रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी ५ जून रोजी मतदान घेण्यात आले. दरम्यान आज ६ जून रोजी मतमोजणी शांततेत पार पडली आहे. तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या नऊ जागा विविध कारणाने रिक्त झाल्या होत्या. त्या जागांची ५ जून रोजी निवडणूक घेण्याचे निवडणूक विभागाने सांगितले होते. त्यानुसार रिक्त असलेल्या आठ ग्रामपंचायतीच्या ९ जागेसाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. परंतु दोन ग्रामपंचायतच्या दोन जागेसाठी अर्ज प्राप्त झाले असल्याने त्या ग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या जागांसाठी ५ जून रोजी पोट निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये सारोळा मारोती आणी बोराखेडी या दोन ग्रामपंचायतच्या दोन जागांसाठी पाच अर्ज प्राप्त झाले होते. या दोन ग्रामपंचायतीच्या दोन्ही जागा अनुसूचित जाती करीता राखीव प्रवर्गातून होत्या. दरम्यान, ५ जून रोजी मतदान प्रक्रीया पार पडली तर आज ६ जून रोजी मतमोजणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सारोळा मारोती येथील एका जागेसाठी भगवान भिकाजी जाधव आणी युवराज गोविंदा कल्याणकर या दोघांमध्ये लढाई झाली असून भगवान भिकाजी जाधव यांना ३०४ मते मिळाली तर युवराज गोविंदा कल्याणकर यांना २२८ मते मिळाली. तर १८ मते नोटाला पडली आहेत. तर बोराखेडी येथील एका जागेसाठी उज्वला अमोल तेलंग, विमल शिवदास पुरभे, सविता मिलिंद तायडे हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतमोजणी अंती उज्वला अमोल तेलंग यांना २३० मते तर विमल शिवदास पुरभे यांना १५४ मते पडली तर सविता मिलिंद तायडे यांना ३७ मते मिळाली असून तीन मते नोटाला पडली आहेत. ही मतमोजणी शांततेत पार पडली असून मतमोजणीसाठी बोराखेडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.