आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांपत्याचा मृत्यू:नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला जाणारे दांपत्य ठार, अहमदाबाद येथे दुर्घटना

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गंगाराम प्लाॅटमधील रहिवासी तथा निवृत्त रेल्वे कर्मचारी रवींद्र नाले हे पत्नी ललिता नाले यांच्यासह, शुक्रवारी अहमदाबाद येथे त्यांच्या मेहुण्यांच्या अत्यसंस्काराला जात हाेते. मणिनगर रेल्वे फाटक क्रमांक ३०८ ओलांडताना, रेल्वेखाली आल्याने या दांपत्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. १६) सकाळी सहा वाजता ही दुर्घटना घडली. रहिवासी रवींद्र नाले (वय ६३) व त्यांच्या पत्नी ललिता नाले (वय ५५) हे गुरूवारी भुसावळातून अहमदाबादला गेले होते.

नातेवाईक झाले रवाना घटनेची माहिती मिळताच नाले यांचा मुलगा पवन हा मणिनगरकडे रवाना झाला. मृतांचे अहमदाबाद येथे शवविच्छेदन झाले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आज भुसावळात अंत्यसंस्कार... दोघा मृतांवर भुसावळात आज (दि.१७) सकाळी ८ वाजता अंत्यसंसकार केले जाणार आहेत. शुक्रवारी रात्री अमदाबाद येथून दोघांचे मृतदेह घेऊन नातेवाईक भुसावळकडे रवाना झाले आहेत, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...