आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील अलफलाह उर्दू शाळेच्या पटांगणात अल-फलाह प्रीमियर लीग या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन झाले. स्पर्धेत चार संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात जहीरोद्दीन वॉरियर संघाने विजेतपद मिळवले. तर आरआरसीसी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत नूर मोहम्मद खान यांचा के.एम. हुसेन वॉरियर्स, हकीम चौधरी यांचा आरआरसीसी, मोहम्मद जैनुद्दीन यांचा जहीरोद्दीन वॉरियर्स आणि असलम शाह यांचा असलम शाह टायगर हे चार संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात जाहीर भाई वाॅरियर संघ आणि हकीम चौधरी यांचा आरआरसीसी संघ यांच्यात लढत झाली. त्यात जहीरोद्दीन वॉरियर्स संघाने विजेतपद मिळवले. यावेळी आयोजकांकडू विजेत्या संघाला ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली. तर उपविजेता संघाला पाच हजार ५५५ रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.
यावेळी टीमचे प्रवर्तक हकीम चौधरी, जहीर खान, नूरमोहम्मद खान, असलम शाह, नगरसेवक आरीफ आझाद, शकील मेंबर, शकूर जमदार, युसूफ टेलर, बिस्मिल्ला ठेकेदार, युनुस भाई उपस्थित होते. संघाचे कर्णधार असगर मण्यार, अनस खान, तौफिक शेख, हाशम शाह, शेख अजीम यांच्यासह क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. यावेळी रिजवान सय्यद मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच हुजेफ खान, नासिर मन्यार, शाहरुख बागवान, समीर खान, आकीब खान, शोएब बागवान, वसीम खान, दानिश खान, शादाब खान, साहील खान, कप्तान शेख असगर मणियार यांनी कामगिरी उत्कृष्ट ठरली. उत्कृष्ट खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला. स्पर्धेला क्रिक्रेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.