आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक यंत्रणेची माहिती:क्रिमिनल ट्रॅकिंग यंत्रणा लवकरच दाखल होणार

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी नाशिक परिक्षेत्रात प्रथमच क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टम सुरू होणार आहे. हे आधुनिक सॉफ्टवेअर लवकरच पोलिस दलात दाखल हाेईल. यामुळे गुन्हेगारांचे प्राेफाइल क्षणात समोर येऊन गुन्ह्यांचा शोध लावणे सुकर होईल, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.विशेष पोलिस महानिरीक्षक रविवारी सायंकाळी भुसावळ डीवायएसपी कार्यालयात वार्षिक निरीक्षणासाठी आले होते. पोलिस अधीक्षक राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे उपस्थित हाेते.

त्यांनी भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दाखल गुन्हे, तपासाचा आढावा घेतला. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहूल गायकवाड, निरीक्षक गजानन पडघन, निरीक्षक विलास शेंडे, सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक, सहायक निरीक्षक अनिल माेरे उपस्थित होते. यानंतर बी.जी.शेखर पाटील यांनी आधुनिक यंत्रणेची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...