आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:ऋषीपंचमीला तापी स्नानासाठी गर्दी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषिपंचमीला तापी स्नान केल्याने पुण्यसंचय होतो, अशी श्रद्धा आहे. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे सणवारांवर निर्बंध होते. त्यामुळे ऋषी पंचमीच्या तापी काठ ओस पडला होता. यंदा मात्र हे चित्र बदलले. कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने केवळ शहरच नव्हे तर यावल, पाडळसे, बामणाेद, फैजपूर, सावदा, अंजाळे येथील शेकडो महिला भाविकांनी तापी स्नानासाठी भुसावळ गाठले.

यामुळे सकाळपासून तापीचे दोन्ही काठ गर्दीने फुलले होते. कोरोनापूर्वीच्या तुलनेत ही गर्दी दुपटीपेक्षा जास्त होती. महिला भाविकांनी आधी तापीच्या पवित्र जलाने स्नान केले. यानंतर नदी काठावरील सप्तऋषी मंदिरात दर्शन यावेळी तापी नदी व मंदिरात अनेक ब्रह्मवृंद ऋषिपंचमीची पूजा सांगत होते. तापी स्नानानंतर अनेक भाविकांनी शहरातील यावल रोड व जामनेर रोडवरील संत गजानन महाराज मंदिर गाठून दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...