आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:क्रुझरला अपघात;‎ चार वादक जखमी‎

यावल‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील किनगाव येथून‎ डांभुर्णीकडे जाणाऱ्या रस्त्यावर‎ भरधाव वेगात असलेले क्रूझर वाहन‎ अनियंत्रित झाल्यामुळे अपघात‎ झाला. त्यात चार जण जखमी झाले‎ असून जखमींना घटनास्थळावरून‎ जळगावच्या जिल्हा शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालयाच्या‎ रुग्णालयात उपचारासाठी दाखल‎ करण्यात आले आहे. हा अपघात‎ शनिवारी दुपारच्या सुमारास घडला.‎

तालुक्यातील चिंचोली येथून‎ बँडमध्ये वाद्य वाजवणाऱ्या‎ कामगारांना घेऊन किनगावकडून‎ डांभुर्णीकडे क्रूझर (क्रमांक एमएच‎ १९ बीजे ७४१२) हे वाहन भरधाव‎ जात होते. दरम्यान किनगाव‎ गावाच्या पुढे वळणावर वाहन‎ नियंत्रित न झाल्याने ते रस्त्याच्या‎ कडेला जाऊन उलटले. या‎ अपघातामध्ये बँडमधील वाद्य‎ वाजवण्याचे काम करणारे चार जण‎ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने‎ घटनास्थळावरून जिल्हा शासकीय‎ रुग्णालयात उपचारासाठी दाखल‎ केले. त्यांची नावे कळाली नाही.‎

बातम्या आणखी आहेत...