आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात महावितरणच्या ट्रान्सफाॅर्मरजवळील डिस्ट्रिब्युशन बॉक्समधील कटआऊट गायब झाले आहेत. या ठिकाणी कटआऊटच्या आतील फ्यूज तारांऐवजी थेट जाड अॅल्युमिनियमचे तार लावून घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, डिस्ट्रिब्युशन बॉक्स उघडे असल्याने अपघाताची भिती आहे. त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे.
शहरात यावल रोड, जळगाव रोड, जामनेर रोड व शहराच्या अंतर्गत भागातील ट्रान्सफॉर्मरच्या पेट्या जमिनीलगत आहेत. त्यांचीही झाकणे निघून वीजप्रवाह असलेल्या तारा उघड्या पडल्या आहेत. अनेक भागांमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या डिस्ट्रिब्युशन बॉक्समध्ये कटआऊट नाहीत. त्यामुळे फ्यूज तारांऐवजी अॅल्युमिनिअमच्या अधिक जाड व अधिक अॅम्पिअरने वीज भार घेणाऱ्या तारा टाकल्या आहेत.
वीज कर्मचाऱ्यांना पकडचा वापर करुन या तारा टाकाव्या लागतात. यामुळे अपघाताची शक्यता आहे. वीज दाब वाढल्यास ही तार वितळत नसल्याने पुढील वीजपुरवठा खंडीत होत नाही. यामुळे शॉर्टसर्किट झाल्यास नुकसान होऊ शकते. यामुळे महावितरणने डिस्ट्रिब्युशन बॉक्सवर फ्जूज तार टाकूनच कटआऊट बसवणे गरजेचे आहे.
सेंट्रल पोलच्या पेट्या उघड्या, उपाय होईनात
शहरातील प्रमुख मार्गांवरील सेंट्रल पोलच्या स्वीच बॉक्सची तोडतोड झाली आहे. यावल, जळगाव, जामनेर रोडवर अनेक ठिकाणी वीज तारा उघड्यावर आहेत. रस्त्यावरील मोकाट जनावरांचा स्पर्श झाल्यास शॉक लागण्याची भिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.