आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन गंडा:सायबर ठगांचे टार्गेट ज्येष्ठ नागरिक; चौघे अडकले हनी ट्रॅपमध्ये

श्रीकांत सराफ | भुसावळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायबर गुन्हेगारीचे लोण आता शहरासोबत ग्रामीण भागातदेखील पोहोचले आहे. भुसावळ शहरातील बाजारपेठ, शहर व तालुका या तीन पोलिस ठाण्यात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीचे तब्बल १७ गुन्हे दाखल झाले आहेत.

त्यापैकी बहुतांश गुन्हे खातरजमा न करता ठगांनी पाठवलेली लिंक ओपन करणे, एटीएम कार्ड, बँकेतून केवायसीच्या बहाण्याने आलेल्या फेक कॉलला बळी पडून ओटीपी व गोपनीय माहिती सांगणे या प्रकारचे आहेत. त्यासाठी सायबर भामटे प्रामुख्याने ज्येष्ठांना टार्गेट करतात. धक्कादायक बाब म्हणजे १७ पैकी ४ गुन्हे हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचे आहेत. भुसावळ शहर व तालुक्यात गेल्या ११ महिन्यांत या पद्धतीचे १७ गुन्हे दाखल झाले आहेत. एकाही गुन्ह्याचा तपास लागलेला नाही.

आधी सावज अडकवतात, नंतर खंडणीची मागणी
१७ पैकी ४ गुन्हे हनी ट्रॅपचे आहेत. याची मोडस ऑपरेंडी म्हणजे सोशल मीडियावर मुली, महिलांचे स्टेट्स ठेवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. चॅटिंगमधून सलगी वाढवून न्यूड (लग्न) फोटोंची देवाणघेवाण होते. सावज अडकताच ब्लॅकमेल करून खंडणी मागितली जाते. नकार दिल्यास दमबाजी, गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. सात जणांनीही अशी कैफियत मांडली आहे.

बातम्या आणखी आहेत...