आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमी:25 फुटांवरील दहीहंडी तीन थर लावून चौथ्या प्रयत्नात फोडली ; बद्री प्लॉट भागात जल्लोष

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाच्या काळानंतर दोन वर्षांनी यंदा प्रथमच जल्लाेषात दहिहंडीचा उत्सव साजरा झाला. शहरात १५ ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यंदा बद्री प्लाॅट भागात जमिनीपासून २५ फुट उंचीवर बांधलेली दहीहंडी, क्रिश काेठारी या गोविंदाने चौथ्या प्रयत्नात फोडली. ही दहीहंडी फाेडायला तीन थर लावले हाेते.

शहरातील बाजारपेठ आणि शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत १५ ठिकाणी शुक्रवारी दहीहंडी उत्सव साजरा झाला. बद्री प्लाॅट भागात सायंकाळपासूनच युवकांची गर्दी झाली होती. डीजेवर ठेका धरत, पाण्यात भिजत युवकांनी जल्लोष केला. यावेळी माजी नगरसेवक निर्मल काेठारी यांनी दाेन टँकर पाण्याची व्यवस्था केली होती. बद्री प्लाॅट परिसरातील अष्टविनायक मंडळातर्फे आयाेजित केलेली ही दहीहंडी पाहाण्यासाठी शहरातील नागरीकांनी गर्दी केली हाेती. यावेळी पाेलिसांचा बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. त्यासोबतच शहरातील विविध भागात रात्री ९.३० नंतर ठिकठिकाणी दहीहंडी फाेडण्यात आली. कुठेही गाेंधळ हाेऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी शहर आणि बाजारपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत पाेलिस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. प्रत्येक दहीहंडी जवळ पाेलिस कर्मचारी हजर होते. पाेलिस निरीक्षक राहूल गायकवाड, निरीक्षक गजानन पडघन यांच्यासह अन्य अधिकारी व पोलिस कर्मचारी हजर होते.

क्रिश कोठारीने जिंकले २१०० रुपयांचे बक्षीस
भुसावळ शहरातील बद्री प्लाॅटमध्ये अष्टविनायक मंडळाची दहीहंडी चौथ्या प्रयत्नात फोडली. क्रिश काेठारी या युवकाने दहीहंडी फोडत २१०० रूपयांचे बक्षिस जिंकले. दत्तधाम नगरातील दहीहंडी विक्की नरोटे याने फोडली. यंदा दहीहंडी निर्बंधमुक्त असल्याने, युवकांमध्ये अधिक उत्साह जाणवला. शहरातील शाळांमध्येही दहीहंडीचे कार्यक्रम झाले.

बातम्या आणखी आहेत...