आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी वाहून गेले:मनवेल येथील बंधारा फोडला, पाणी वाया

यावल6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मनवेल येथील भोनक नदीपात्रात लोकसहभागातून तयार केलेला मातीचा बंधारे अज्ञात व्यक्तीने फोडला. यामुळे नदी पात्रता साठलेले पाणी वाहून गेले.

मनवेल येथील भोनक नदी पात्रात दरवर्षी जंगल विक्रीतून आलेला पैसा व शेतकऱ्यांच्या मदतीने लोकसहभागातून बंधारे तयार केले जातात. पाणी अडवून परिसरातील भूजल पातळी वाढवणे हा त्याचा उद्देश असतो. मात्र, रेती उत्खनन करण्यास नदी पात्रातील पाणीसाठा अडसर ठरत असल्याने अज्ञात व्यक्तीने हा बंधारा फोडल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे. महसूल प्रशासनाने या नदीपात्रातून अनधिकृतपणे रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील आहे.

बातम्या आणखी आहेत...