आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:कपाशीच्या शेतात शेळ्या चारून केले नुकसान

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अट्रावल शिवारातील शेतात शेळ्या चारून कपाशीचे नुकसान करण्यात आले. शेळ्यांनी सुमारे २५ हजार रुपयांचा कापूस फस्त केला. याप्रकरणी यावल पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली.

अट्रावल येथील शेतकरी रमेश काशीनाथ कोळी यांच्या गट क्रमांक ९२८ मध्ये कपाशी लावली आहे. या पिकात अज्ञात व्यक्तीने शेळ्या चारून २५ हजार रुपयांचे नुकसान केले. रविवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून यावल तालुक्यात मोकाट गुरांच्या त्रासाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यापूर्वी असे प्रकार झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...