आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:डांभुर्णी, राजोरा व हिंगोण्यात सरासरी 58.31 टक्के मतदान; आज निकाल

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डांभुर्णी, राजोरा व हिगोंणा या तीन ग्रामपंचायतींच्या ३ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. राजोरा येथे सुरुवातीला ईव्हीएमच्या बॅलेट युनिटच्या चिन्ह वरून तक्रार झाली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांचा गैरसमज दूर करत शांततेत मतदान पार पडले. तिन्ही ग्रा.पं.मध्ये ५८.३१ टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी १० वाजेला तहसील कार्यालयात मतमोजणी होईल. डांभुर्णी, राजोरा व हिंगोणा या तीन ग्रामपंचायतींमधील तीन जागांसाठी पोटनिवडणूक लागली होती. रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत तिन्ही गावात शांततेत मतदान पार पडले.

राजोरा येथे २१५ मतदारांपैकी १६९ मतदारांनी हक्क बजावला. ७८.६० टक्के मतदान झाले. डांभुर्णी येथे ७०६ पैकी ३९७ म्हणजेच ५६.२३ टक्के मतदान झाले. हिंगोणा येथे ११९० पैकी ६६५ मतदारांनी आपला हक्क बजावला. तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी होईल. तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, सुयोग पाटील, सूरज जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी हनीफ तडवी, बबीता चौधरी, पी.ए.कडनोर उपस्थित राहतील.

चिन्हासंदर्भात तक्रार... राजोरा येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात इव्हीएम सिलिंगवेळी टीव्ही या चिन्हासंर्दभात तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाच्या अधिकृत टीव्ही चिन्हाची पडताळणी करून चिन्हात बदल केला होता. मात्र, बदल करतेवेळी उमेदवार हजर नव्हते. मतदानावेळी त्यांनी पुन्हा चिन्हासंर्दभात आक्षेप घेतला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी बबीता चौधरी यांनी त्यांचा गैरसमज दूर केला. यानंतर पुढील प्रक्रिया पार पडली.

बातम्या आणखी आहेत...