आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाचा उपचार अभावीच मृत्यू:सर्पदंशाने मृत्यू; सुविधा न मिळाल्याचा आरोप

खेडदिगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेतिया येथील युवा शेतकरी अनिल काशिनाथ पवार (वय ३८) हे कोचरा (ता.शहादा) येथील शेतात काम करीत असताना सर्प दंश झाल्याने मृत्यू झाला. त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुबींयांनी केला आहे.पवार यांना सर्पदंश झाल्यानंतर ते आपल्या मित्रांसोबत प्राथमिक आरोग्य केंद्र खेतिया येथे आला असता त्यांना प्रथमोपचार देऊन पानसेमल येथे पाठवण्यात आले.

तिथे ही काही काळ उपचार करून पुढे घेऊन जाण्यास सांगितले. त्या दरम्यान या युवकाचा उपचार अभावीच मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केला. या वेळी अधिकाऱ्यांना कुटुंबिय आणि नातेवाइकांनी घेराव घेराव घालून संताप व्यक्त केला. नागरिकांचा आक्रोश पाहून प्रशासनाला या आरोग्य केंद्राच्या चौकशीचे आश्वासन द्यावे लागले. तसेच दोषींना निलंबितची मागणी नागरिकांनी केली. निवेदन स्वीकारून तहसीलदार सस्तीया यांनी सांगितले या घटनेची चौकशी समिती गठीत करून केली जाईल व दोषीांवर कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...