आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपी आजारामुळे मृत्यू:आमोद्यात लंपीसदृश आजाराने बैलाचा मृत्यू

आमोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमोदा (ता.यावल) येथील शेतकरी प्रदीप जनार्दन चौधरी यांचा बैल पोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी २७ ऑगस्टला लंपी आजारामुळे मृत्यू पावला. हा बैल सुमारे दोन आठवड्यांपासून लंपी सदृश आजाराने ग्रस्त होता.

शेतकरी प्रदीप जनार्दन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वी शेती कसण्यासाठी १ लाख २० हजार रुपये किमतीची जोडी खरेदी केली होती. त्यापैकी एक बैल गेल्या बारा दिवसांपासून आजारी होता. त्यावर सर्व उपचार करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. तरीही उपयोग झाला नाही. दरम्यान, पोळ्याच्या दिवशी शेतकरी कुटुंबाने सदरहू बैलाची पूजा केली. त्यास लंपी सदृश लक्षणे असल्याने इतर जनावरांपासून अलिप्त बांधले होते. मात्र, पोळा झाल्यावर रात्रीच बैलाने प्राण सोडले.

बातम्या आणखी आहेत...