आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसरातील सौंदर्यात भर‎:राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या‎ पुतळ्याचे सुशोभिकरण‎

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेने यावलरोडवरील राष्ट्रपिता‎ महात्मा गांधी पुतळ्याच्या‎ सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे.‎ यासाठी नऊ लाख रुपयांचा निधी खर्च‎ होणार आहे. स्मारकात नवीन मार्बल,‎ रंगरंगोटी, लॉन, पेव्हर ब्लॉक,‎ प्रकाशासाठी आकर्षक दिवे अशी कामे‎ होणार असल्याने, या स्मारकाचे स्वरुप‎ बदलेल.‎ ‎ पालिकेने १९७० च्या दशकात‎ यावलरोडवर महात्मा गांधी यांच्या‎ पुतळ्याची उभारणी केली.

यानंतर‎ केवळ पुतळ्याची रंगरंगोटी व्यतिरिक्त‎ अन्य कामे झाले नाहीत. सध्या या‎ पुतळ्याचे ग्रीलची मोडतोड होऊन लॉन‎ नामशेष झाले होते. त्यामुळे या‎ स्मारकाच्या पुनरुज्जीवनासाठी नऊ‎ लाख रुपयांची निविदा काढून कामाला‎ सुरवात केली आहे. यामध्ये पुतळ्याला‎ रंगरंगोटी, नवीन ग्रील, पेव्हर ब्लॉक,‎ नवीन मार्बलचा चबुतरा, आकर्षक दिवे‎ आदी उपाययोजना केल्या जातील.‎ पालिकेने हे काम सुरु केले असून मार्च‎ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल.‎

बातम्या आणखी आहेत...