आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैऋत्य मोसमी वारे माघारीचे परिणाम:कमाल तापमानात घट; हुडहुडी वाढली

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर थंडीचे प्रमाण वाढले आहे. आगामी आठवड्यापासून थंडीचा जोर पुन्हा वाढेल. दरम्यान, मंगळवारी शहराचे किमान तापमान १७.२ अंश होते. ते आठवडाभरात दीड ते दोन अंशांनी घसरून १५ ते १६ अंशांपर्यंत येण्याची भिती आहे. गत दोन दिवसांच्या तुलनेत शहरातील किमान तापमानात ०.६ अंश, तर दिवसाचे कमाल तापमान ३५.९ अंशांवरून २८.८ अंशांपर्यंत घसरले आहे.

अभ्यासकांच्या अंदाजानुसार भुसावळसह विभागात २ ते ७ नोव्हेंबर दरम्यान कमाल तापमान सरासरी ३५ अंशांच्या आत राहील. किमान तापमानात काही अंशी स्थिरता व चढ-उतार होऊ शकेल. तरीही ते १५ ते १७ अंशांदरम्यान राहील. मात्र, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर थंडीचे प्रमाण वाढेल. भुसावळ शहराचे शनिवार व रविवारचे किमान तापमान १७.८, तर मंगळवारचे किमान तापमान १७.२ अंश होते. त्यात सरासरी ०.६ अंशांची घट झाली. तर कमाल तापमान ३५.९ अंशांवरून २८.८ अंशांपर्यंत घसरले. थंडीचे प्रमाण वाढल्यावर त्यात पुन्हा घट होईल.

पावसाची शक्यता नाही, तापमान वाढेल
नैऋत्य मोसमी वारे २३ ऑक्टोबरला माघारी गेले. यामुळे सर्वत्र निरभ्र आकाश व कोरडे हवामान आहे. यानंतर हवेत गारठा निर्माण होऊन थंडीचे प्रमाण वाढले. मात्र, आगामी आठवडाभर थंडीचे प्रमाण कायम राहील. दिवसाचे तापमान दुपारी १२ ते ४ या वेळेत किचिंत वाढीची शक्यता आहे. तूर्त पावसाची मात्र शक्यता नाही.
नीलेश गोरे, हवामान अभ्यासक, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...