आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीने गावातील सर्व चौकांमध्ये एकूण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या ग्रामपंचायतीचा आदर्श संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी घ्यावा, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. राज्यामध्ये हिवरे बाजार, पाटोदा, राळेगणसिद्धी यांच्यानंतर आता साकेगावचा आदर्श ग्राम म्हणून लौकिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावातील बस स्थानकावर आमदार संजय सावकारे, पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी साेमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या उपस्थितीत सीसीटीव्हीचे लोकार्पण झाले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी झाली. एलसीडी स्क्रीनची फीत कापून ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण झाले. पोलिस निरीक्षक विलास शेंडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे व सहायक निरीक्षक अमोल पवार उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच आनंद ठाकरे यांनी केले. आमदार सावकारे यांनी मनोगत व्यक्त करताना साकेगाव ग्रामपंचायत एकमेव पायाभूत सुविधा पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत आहे. पंधराव्या वित्त आयोगामध्ये गावाच्या सुरक्षेसंदर्भात घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
वर्षभराचा खर्च भरला साकेगाव ग्रामपंचायतीने गावातील चौकाचौकात प्रवेशद्वारे आदींवर ३२ कॅमेरे लावले आहेत. अत्याधुनिक एचडी क्वालिटी, नाईट कलर व आॅटो सेन्सर नाईट लॅम्पची सुविधा आहे. संपूर्ण यंत्रणेसाठी ॲडव्हान्स मेंटेनन्स चार्ज ग्रामपंचायत प्रशासनाने अदा केलेला आहे, यामुळे पुढील एक वर्ष कॅमेऱ्यांची देखभाल केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.