आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:साकेगाव, कंडारी येथे संरक्षण भिंत ; अधिकाऱ्यांनी केली दोन्ही गावांमध्ये पाहणी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेळगाव बॅरेजचे काम पूर्णत्वाकडे येत असून, या धरणाच्या बॅकवॉटरमुळे साकेगाव व कंडारी या गावांना संरक्षण भिंत मंजूर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य रविंद्र पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी दोन्ही गावांच्या नदीकाठाला भेट देऊन पाहणी केली. साकेगाव व कंडारी या गावांना शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटरचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी या गावांना संरक्षण भिंत मंजूर करावी, अशी मागणी केली होती. याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित विभागाला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. संरक्षण भिंतीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत. दोन्ही गावांना संरक्षण भिंत मंजूर झाल्यास बॅकवॉटरमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यापासून दोन्ही गावांची संरक्षण होईल.

बातम्या आणखी आहेत...