आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:कार्यादेश फलकांचे ठेकेदारांना वावडे ; 12 कोटींच्या रस्ते कामांवरही फलक

भुसावळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेने शहरात विविध योजनांतर्गत कामे सुरू केली आहे. या कामांच्या कार्यादेशाप्रमाणे माहिती फलक लावण्याचे आदेश मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिले आहेत. मात्र, प्रमुख रस्ता दुभाजक व रिटेनिंग वॉल ही कामे कामे वगळता इतरत्र कुठेही असे फलक लावण्याची तसदी ठेकेदारांनी घेतलेली नाही. १२ कोटींच्या रस्ते कामांवरही फलक नाहीत.

पालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास कामांवर त्या कामाचे स्वरुप, अंदाजित रक्कम, मक्तेदाराचे नाव, कामाची मुदत, किती दिवस कामाचे उत्तरदायित्व आहे, ही माहिती फलकावर लिहणे अनिवार्य आहे. शहरात असे फलक नसल्याचे लक्षात येताच मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी संबंधित कामे बंद करावी. कामे करण्यापूर्वी कार्यादेशाप्रमाणे जागेवर त्वरित फलक लावण्याचे आदेश दिले होते. यानंतर रस्ता दुभाजकांची कामे व रिटेनिंग वॉलच्या कामांवर असे फलक लागले. पण, शहरात सुरु असलेल्या १२ कोटी अनुदानातील २३ कामांवर हे फलक नाहीत. यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली होत आहे.

बातम्या आणखी आहेत...