आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरणगाव शहरातून जाणारा महामार्ग बायपास झाल्याने फुलगाव ते सात पुलापुढील अंतरापर्यंत जुन्या महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरक्षः चाळण झाली आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त असून वारंवार अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. हा मार्ग समांतर महामार्ग करावा, ही मागणी देखील रखडली आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती तरी करावी, अशी मागणी आहे.
पूर्वीचा महामार्ग क्रमांक ६ हा वरणगाव शहरातून गेलेला होता. त्यामुळे २४ तास वाहनांची वर्दळ असायची. तसेच या मार्गाची वारंवार दुरुस्ती व्हायची. मात्र, या मार्गाचे फुलगाव ते तळवेलपर्यंत चौपदरीकरण होऊन बायपास तयार झाल्याने वरणगाव शहरातून जाणारा महामार्ग ओस पडला आहे. या जुन्या महामार्गावरून केवळ वरणगाव शहर, बोदवडकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. तसेच तळवेल, पिंपळगाव, वझरखेडे, बोहर्डी, काहुरखेडे, फुलगाव, जाडगाव-मन्यारखेडे आदी गावातील नागरिकांचा दैनंदिन कामकाजासाठी वरणगावसोबत सबंध येतो. मात्र, या महामार्गाची फुलगाव ते सातपुलाच्या पुढील काही अंतरापर्यंत जीवघेण्या खड्ड्यांमुळे अक्षरक्ष: चाळण झाली आहे. त्यावरून ये-जा करताना खड्डे चुकवताना अपघात होतात. ही संभाव्य अडचण पाहता वरणगाव शहरातून जाणाऱ्या किमान तीन किमी जुन्या महामार्गाचे समांतर महामार्गात रुपांतर करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. मात्र, अद्याप मंजुरी नाही.
तळवेल ग्रा.पं.चा ठराव
तळवेल, पिंपळगाव, वझरखेडा, बेलखेडा बोहर्डी, काहुरखेडे येथील नागरीक, विद्यार्थ्यांना नियमित वरणगावला यावे लागते. मात्र, या मार्गाची दुरवस्था झाल्याने त्रास होतो. त्यामुळे दुरुस्ती व्हावी यासाठी तळवेल ग्रामपंचायतीने मासिक सभेत ठराव केला आहे.
डॉ. सुनील पाटील, सरपंच, तळवेल
पाठपुरावा सुरू आहे
वरणगाव शहरातील पूर्वीचा महामार्ग आताच्या चौपदरी महामार्गाला समांतर महामार्ग व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा केला आहे. समांतर महामार्गाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव देखील पाठवला आहे.
सुनील काळे, माजी नगराध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.