आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:अंतुर्ली ग्रामस्थांची बससेवेची मागणी पूर्ण; गावात आलेल्या बसचे स्वागत

अंतुर्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संप काळापासून बंद असलेली अंतुर्ली-रावेर बस सेवा सुरू झाली असून बुधवारी रावेर येथून अंतुर्लीत पाेहोचलेल्या पहिल्या बसच्या चालक व वाहकांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. बससेवा पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह, आनंदाचे वातावरण दिसले.

या संदर्भात तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल वाडिले व अंतुर्ली शहर काँग्रेसचे शे.भैय्या शे.करीम यांनी रावेर एस.टी. आगार प्रमुख बेंडकुळे यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनावर नागरिक, प्रवाशांच्या सह्या आहेत. त्या सोबत येथील सरपंचाचे पत्र देण्यात आले होते. त्याची दखल घेत बुधवारी सकाळी १० वाजता रावेर येथून अंतुर्लीसाठी बस सोडण्यात आली. सकाळी ११ वाजता अंतुर्ली येथून विधिवत पूजा करून बससेवा सुरू करण्यात आली. आलेल्या बसचे स्वागत उपसरपंच व्ही.आर. महाजन व ज्येष्ठ नागरिक शेख बाबू हुसेन यांच्या हस्ते पूजन करून झाले. त्याचप्रमाणे चालक व वाहक यांचा सत्कारही तालुका उपाध्यक्ष वाडिले व शहरचे शेख भैय्या शेख यांनी पुष्पहार, श्रीफळ देऊन केला. सर्व प्रवाशांनी बस सेवेचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली.

लवकरच बस सेवा नियमित सुरू होईल व संध्याकाळी मुक्कामी बसची मागणीही केली. रावेर येथून संध्याकाळी साडेसहा वाजता मुक्कामी व अंतुर्ली येथून पहाटे साडेसहा वाजता रावेरसाठी बस साेडण्याची मागणी केली. याप्रसंगी उल्हास देशमुख, बंडू सूर्यवंशी, किसन भोई, सुनील सुरवाडे, हौसीलाल भोई, काशिनाथ महाजन, रमेश महाले, चावदस बेलदार, सावकारे, सदू दुटटे, गोलू महाजन, अग्रवाल मेडिकल, शांताबाई बेलदार, समाधान लढेवाले, नामदेव भोई, सुमित वाडिले यांच्यासह प्रवासी व नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...