आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार:लोणच्यासाठी कैऱ्यांना मागणी; 60 रुपये किलोचा दर

बुलढाणा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभर जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या लोणच्यासाठी पावसानंतर कैऱ्यांना मागणी वाढते. सध्या डॉ. आंबेडकर संकुलाजवळ भरणाऱ्या स्वतंत्र बाजारात कैऱ्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. रसलपुरा, सरदार, घाटावरची आणि गावराण कैऱ्यांना ५० ते ६० रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यासाठी शहरात दररोज १५ टन कैऱ्यांची स्थानिक बाजारात आवक होत आहे.

१० रुपये किलोची मजुरी
कैरी खरेदी केल्यानंतर लोणच्यासाठी कैऱ्यांच्या फोडी करुन देण्यासाठी १० रुपये किलोची मजूरी आकारली जाते. बरेच ग्राहक कैरी खरेदीनंतर घरी फोडी करण्याऐवजी बाजारातूनच फोडी करुन नेतात. यातूनही पाच ते सहा जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...