आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा इशारा:जामठीत वेश्या व्यवसाय बंद करण्याची मागणी

जामठीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लोणवाडी रस्त्यावरील एका वस्तीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याने, नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्या मिराबाई बोरसे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक व पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले जाणार आहे. या भागात दिवस-रात्र गोंधळ सुरू असल्याने नागरिकांचा रहिवास कठीण झाला आहे. त्यामुळे वेशाव्यवसाय प्रशासनाने बंद करावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असे निवेदन दिले जाणार आहे. निवेदनावर परिसरातील सुमारे दीडशे नागरिकांच्या सह्या आहेत, असे बोरसे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...