आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर राेडवरील समतानगरातील रेल्वेच्या दोन रिकाम्या निवासस्थानात गावठी दारू, पन्नीतील दारूची विक्री केली जात होती. त्यामुळे ही निवासस्थाने गुन्हेगारांचा अड्डा बनली हाेती. त्यामुळे पाेलिस आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्त माेहीम राबवूनत शुक्रवारी सकाळी, रिकाम्या निवासस्थानांवर बुलडाेझर चालवला. पाच तासातच दोन्ही निवासस्थाने जमिनदाेस्त केली. समतानगरात या निवासस्थानावर पाेलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांनी कब्जा केला होता. या रिकाम्या निवासस्थानात गुन्हेगारांची उठबस होती. सायंकाळी जमलेले गुन्हेगार तेथे रात्री उशीरापर्यंत थांबून गाेंधळ घालत हाेते. यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत हाेता. पाेलिसांनी याबाबत गुन्हेगारांची माहिती काढली.समता नगरातील अवैध दारू विक्री हाेत असलेला गुन्हेगारांचा अड्डा असलेली, रेल्वेचे रिकामी दोन निवासस्थाने जेसीबीने पाडण्यात आली.
रेल्वेच्या रिकाम्या निवासस्थानांचे होणार सर्वेक्षण रेल्वेच्या अनेक रिकाम्या निवास्थानांचे रेल्वेतर्फे सर्वेक्षण केले जाणार आहे.रिकाम्या निवासस्थानांमध्ये काेण राहाते,याची माहिती संकलित केली जाणार आहे.निवासस्था नांमध्ये अवैध व्यवसाय सुरू आहे का?याची माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे,असे डीवायएसपी सोमनाथ वाघचाैरे यांनी सांगितले. निरीक्षक गजानन पडघन यांच्यासह १० पाेलिस कर्मचारी हजर होते. बंदाेबस्त असल्याने सुरळीतपणे निवासस्थाने पाडण्यात आली. १० वाजता सुरू झालेली ही माेहिम दुपारी २ वाजता पूर्ण झाली.यात १० मजुरांनीही सहभाग घेतला.
परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी वाढल्याने शुक्रवारी धडक कारवाई केली. यासंदर्भा पाेलिस, रेल्वे प्रशासनाची बैठक झाली होती. समता नगरातील रिकाम्या निवासस्थानात गुन्हेगार येत असल्याने, सामाजिक शांततेला यापासून बाधा निर्माण हाेण्याचा धोका होता. गुन्हेगारांचा अड्डा पाडण्यासाठी डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांनी गुरूवारी, रेल्वे प्रशासनासाेबत चर्चा केली होती. रिकामे निवासस्थाने पाडण्यावर पोलिस आणि रेल्वे प्रशासनाचे एकमत झाले. त्याची तात्काळ शुक्रवारी अंमलबजावणी झाली. दीनदयालनगरात हाेणार कारवाई शहरातील ज्या घरांमध्ये अवैध प्रकार चालतात, तेथे पाेलिस व पालिकेच्या माध्यमातून धडक कारवाई केली जाणार आहे. अशी घरे जमीनदाेस्त करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.शहरातील दीनदयालनगरातील काही घरे पाेलिस प्रशासनाच्या रडारवर आहेत. -साेमनाथ वाघचाैरे, डीवायएसपी, भुसावळ
मुंबईच्या जाेजाेला प्रसाद मंुबईतून तडीपार झालेला विश्वकर्मा देहाडे उर्फ जाेजाे (रा.वाराणसी) हा समतानगरात दाेन दिवसांपुर्वी आला हाेता.ताे परिसरात दहशत निर्माण करत हाेता.गुरूवारी रात्री त्याने एका व्यक्तीला डांबले होते. याची माहिती डीवायएसपींना मिळताच त्यांनी शहर पाेलिसांचे पथक पाठवून जाेजाेला ताब्यात घेत तेथेच प्रसाद दिला. रात्रीच वाराणसीला पाठवले.पाच तासात मोहीम फत्ते समता नगरात रेल्वेची दाेन रिकामी निवासस्थाने पाडताना, पाेलिस
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.