आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामनेर रोडवरील रानातला महादेव हुडको कॉलनी परिसरात दोन भावांना डेंग्यूची लागण झाली आहे. ‘दिव्य मराठी’ने रविवारी याबाबत वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागाने हुडको भागात रविवारी २७० घरांमध्ये कंटेनर सर्वेक्षण केले. यापैकी १७ घरांमधील १९ कंटेनरमध्ये डेंग्यूला कारणीभूत ठरणारे एडीस इजिप्ती डास व अंडी आढळली. आरोग्य विभागाने हे कंटेनर नष्ट केले आहेत.
हुडको रानातला महादेव मंदिर भागातील तीर्थराज मंगेश पाटील (वय ४) व स्वराज मंगेश पाटील (वय १४ महिने) या दोन्ही भावांना डेंग्यूची लागण झाली. या दोघांवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी पालिकेचे आरोेग्य सहाय्यक सुनील महाजन, आरोग्य सेवक प्रशांत चौधरी, ज्ञानदेव चोपडे आदींनी हुडको भागात १ हजार ६५ कंटेनरची तपासणी केली. त्यात डेंग्यूच्या एडीस इजिप्ती डास व अळ्या असलेले १९ कंटेनर आढळले.
गॅरेज मालकांचे दुर्लक्ष
आरोग्य विभागाने जामनेर रोडवरील तिरुपती पेट्रोल पंपाच्या परिसरातीस गॅरेजमधील टायर्सची तपासणी केली होती. त्यात सर्व टायरमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासाच्या अळ्या आढळल्या होत्या. त्यामुळे खबरदारी घ्यावी अशा सूचना गॅरेज चालकांना दिल्या होत्या. मात्र त्यांनी दूर्लक्ष केल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.