आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:अमळनेरात डेंग्यूने पाय पसरले ; स्वच्छता ठेवा

अमळनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेंग्यू आता अमळनेरकरांच्या जीवावर उठला आहे. शहरातील विद्यानगर भागातील ३१ वर्षीय मुकूल पिंगळे या तरुणाचा मंगळवारी पहाटे धुळ्यात उपचार सुरु असतांना डेंग्यूने मृत्यू झाला. घरातील एकूलत्या मुलाचा मृत्यू झाल्याने आई व पत्नीला धक्का बसला. शहरातील खुल्या भूखंडात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्याचा निचरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, ताप अंगावर काढू नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व डेंग्यूपासून दूर राहावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले.

डेंग्यूची लक्षणे : अचानक तीव्र ताप येणे, डोक्याच्या पुढच्या भागात वेदना होणे, डोळ्यांची हालचाल करताना वेदना, स्नायू आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना, चव, भूक नष्ट होणे, अशी लक्षणे दिसतात.दरम्यान शिरूड येथील आठ वर्षीय बालकालाही डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाली. तो पुण्याला राहत असून शिरूड येथे गावी आला होता. तर एलआयसी कॉलनीतील महिलेला डेंग्यूसदृश्य आजाराची लक्षणे जाणवली.

पुण्यात होता कामाला
शहरातील विद्यानगर भागातील रहिवासी मुकुल अनिल पिंगळे हा पिंगळे कुटुंबातील एकलता मुलगा. पुण्यात तो कंपनीत होता. अमळनेरात आई वास्तव्य करते. तिला भेटण्यासाठी तो शहरात आला असता त्याला त्रास होऊ लागल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचाराला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यास डेंग्यूने गाठले. या घटनेने अमळनेरकरांना धक्का बसला.

बातम्या आणखी आहेत...