आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ विभागातील प्रवाशांची मागणी पूर्ण:देवळाली मेमू १५, वर्धा पॅसेंजर १६ सप्टेंबरपासून

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ-देवळाली आणि भुसावळ-वर्धा दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित गाड्या पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठी नियोजित वेळापत्रकात किंचित बदल झाला आहे. त्यानुसार भुसावळ-देवळाली मेमू १६ एवजी १५ सप्टेंबर, तर भुसावळ-वर्धा पॅसेंजर १५ एवजी १६ सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

काेराेनापासून भुसावळ-देवळाली (११११४) शटल बंद करण्यात आली होती. प्रवाशांची सातत्याने मागणी असल्याने ही गाडी १६ सप्टेंबरपासून सुरू करणे नियोजित होते. मात्र, ही गाडी आता एक दिवस अगोदर म्हणजेच १५ सप्टेंबरपासून भुसावळ जंक्शनवरून सुरू होईल. तर देवळाली येथून ही गाडी १६ सप्टेंबरला भुसावळसाठी सुटेल. पूर्वी ही गाडी १७ सप्टेंबरपासून सुरू होणार हाेती. ती आता एक दिवस अगोदर धावेल. यासोबतच भुसावळ-वर्धा-भुसावळ (१११२१) ही गाडी १५ सप्टेंबरपासून सुरू होणार हाेती. ती आता १६ सप्टेंबरपासून सेवेत दाखल होईल.

बातम्या आणखी आहेत...