आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किनगाव (ता.यावल) ते धुळे या शेतकरी सहवेदना निर्धार पदयात्रोला सोमवारी सुरुवात झाली. किनगाव येथे शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख स्व.गणेश पाटील उर्फ कडूअप्पा यांना श्रद्धाजली अर्पण करून ही पदयात्रा मार्गस्थ झाली. ती १९ मार्च रोजी धुळे येथे पोहोचून समारोप होईल. शेतकरी संघटनेची सहवेदना आणि निर्धार पदयात्रा यंदा किनगाव ते धुळे अशी निघाली आहे. १३ ते १९ मार्चदरम्यान ही पदयात्रा किनगाव-चोपडा-अमळनेर ते धुळे असा एकुण ११० किलोमीटरचा प्रवास करेल. मुंबई येथील डॉ.राजीव बसर्गेकर हे यात्रेचे मुख्य संयोजक असून परभणी येथील सुभाष कच्छवे यांचेही सहकार्य लाभत आहे.
या पदयात्रेला १३ रोजी सकाळी ९ वाजता किनगाव येथून सुरूवात झाली. तत्पूर्वी किनगाव येथील शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते गणेश दिनकर पाटील (कडूअप्पा) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी आमदार रमेश चौधरी, सरपंच निर्मला पाटील, माजी पं.स.सदस्य उमाकांत पाटील, राम मंदीर संस्थानचे अध्यक्ष के.जे.पाटील, प्रगतशील शेतकरी सुरेश चौधरी, चंद्रकांत चौधरी, डॉ.योगेश पालवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संभाजी वराडे यांनी केले.
धुळे येथील समारोपाला यांची राहणार उपस्थिती धुळे येथील समारोपाला विठ्ठलराव डांगे (नांदेड), कालिदास आपेट, सतीश गलांडे (परभणी), ऋतगंधा देशमुख (जळगाव), शामराव धावडे (अमरावती), राजीव बसर्गेकर (नवी मुंबई), रामकिशन आप्पा रुद्राक्ष (जवळाबाजार जि.हिंगोली), तानाजी फडतरे देशमुख, बालाजी आबादार (नांदेड), कालिदास आपेट (गिरवली जि.बीड), नीळकंठ डांगे (जवळाबाजार, जि.हिंगोली), सतीश गलांडे (परभणी), विठ्ठलराज डांगे (कंधार जि.नांदेड), अमर हबीब आणि अनंत देशपांडे उपस्थित राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.