आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:हद्दपारीचे उल्लंघन, खरातला कोठडी ; परवानगी न घेताच या आदेशाचे उल्लंघन

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हद्दपार असलेल्या आतिश उर्फ रविकांत खरात (वय २५, रा.समता नगर, भुसावळ) याला मंगळवारी रात्री ९.४५ वाजता गावठी पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आले होते. बुधवारी न्यायालयाने त्यास शुक्रवारपर्यंत (दि.९) पोलिस कोठडी सुनावली.आतिश रवींद्र खरात याला दाेन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. कोणतेही ठोस कारण किंवा परवानगी न घेताच या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात आला होता. त्याच्याजवळ गावठी पिस्तूल असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री ९.४५ वाजता समता नगरातून आतिशला ताब्यात घेण्यात आले. झडतीत त्याच्याजवळ गावठी पिस्तूल सापडले. यानंतर पोलिसांतर्फे विशाल साळुंखे यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल झाला. आतिशविरूद्ध शहर पोलिसांत तीन गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वीदेखील हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...