आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:हिवाळी अधिवेशनावर ठेवीदार मोर्चा काढणार

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथे १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर खान्देश ठेवीदार कृती समिती मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा भुसावळ येथून २५ डिसेंबरला रवाना हाेईल.

जिल्ह्यातील ठेवीदारांना न्याय मिळत नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या माध्यमातून पतसंस्थांचे अर्ज भरून सहकार मंत्र्यांकडे सादर करण्यात येतील. जिल्हाभरातून ३०० असे ५०० ठेवीदार मोर्चात सहभागी होतील. खान्देश ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील मोर्चाचे नेतृत्व करतील. नियोजनासाठी शनिवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता भुसावळ येथील डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, तर मंगळवारी (दि.२०) फैजपूर येथे बाजार समितीच्या आवारात दुपारी २ वाजता बैठक होईल.

बातम्या आणखी आहेत...