आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबन:राज्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अद्याप निलंबन प्रस्ताव नाही ; बच्चू कडू यांनी 27 मे रोजी प्रांत कार्यालयात बैठक घेतली

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी व अभियंत्याच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्याच्या तोंडी सूचना प्रांताधिकाऱ्यांना बैठकीत केल्या हाेत्या. मात्र, प्रांत कार्यालयाकडून अद्याप प्रस्ताव पाठवलेले नाही. भुसावळ दौऱ्यावर असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी २७ मे रोजी प्रांत कार्यालयात बैठक घेतली. त्यात शहरातील घरकुल व रमाई योजनेच्या मुद्द्यावरून मुख्याधिकारी व अभियंत्याला धारेवर धरले हाेते. राज्यमंत्री कडू यांनी प्रांताधिकाऱ्यांना पालिकेचे अभियंता, मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या हाेत्या. त्यामुळे पालिका कार्यालयात खळबळ उडाली हाेती. मंत्री यांनी दिलेल्या सूचनांचे पालन झाले की नाही? याबाबत प्रांताधिकारी रामसिंग सुलामे यांना विचारले असता अद्याप प्रस्ताव पाठवला नसल्याचे सांगितले. वरिष्ठ पातळीवरून लेखी आदेश आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव तयार केला जाताे. त्यामुळे अद्याप एकही प्रस्ताव तयार करून पाठवला गेला नाही, असे प्रांत रामसिंग सुलामे यांनी सांगितले. त्यामुळे पुढील घडामोडींकडे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...