आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस आगीत खाक:खडका शिवारातील दीड एकर ऊस आगीत खाक; महसूल पंचनाम्यानुसार सव्वालाखाचे नुकसान

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खडका येथील शेतकरी पांडुरंग बाबुराव भारंबे यांच्या शेतातील दीड एकर ऊस जळून खाक झाला. यामुळे भारंबे यांचे सुमारे सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे याप्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

खडका शिवारात पांडुरंग भारंबे यांनी ऊस लावला आहे. याच शेतात बुधवारी सकाळी ११.३० ते १२ या वेळेत आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने दीड एकर ऊस खाक झाला. आग लागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धावपळ केली. शेतात लागलेली आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र आग वेगाने फैलावल्याने दीड एकर उस जळून खाक झाला. या प्रकरणी भारंबे यांनी महसूल विभागाकडे दिलेल्या माहितीवरून तलाठींनी पंचनामा केला. १ लाख २० हजारांचे उसाचे नुकसान झाल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...