आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या प्रगती पॅनलने सर्व १४ जागा जिंकल्या होत्या. आता संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विविध शाळांमधील चेअरमन निवड बिनविरोध पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष मोहंमद ताहेर शेख चाँद, तर उपाध्यक्षपदी हाजी शब्बीर खान मोहंमद खान यांची बिनविरोध निवड झाली. सर्व सदस्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्राधान्य देण्याचा एकमुखी निर्धार केला.
त्यासाठी नियोजन देखील करण्यात येणार आहे. संस्थेच्या युनिक आयटीआयच्या सभागृहात संस्थेच्या संचालकांची बैठक घेण्यात आली. त्यात सर्वानुमते संस्थापक अध्यक्ष मोहंमद ताहेर शेख चाँद यांची अध्यक्षपदी, तर हाजी शब्बीर खान मोहंमद खान यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सचिव पदावर जफरउल्ला खान, सहसचिव मो. याकूब शेख यासिन, तर खजिनदार म्हणून अजीज खान हमीद खान यांची निवड झाली. या बैठकीला इक्बाल खान, अय्युब खान, गुलाम रसूल हाजी गुलाम दस्तगीर, मुस्तफा खान, शेख इब्राहिम शेख चाँद, युसूफ खान ताहेर खान, हुसेन खान, जहीर बेग नूर बेग मिर्झा यांचीदेखील उपस्थिती होती.
विविध शाळांचे चेअरमन शेख इब्राहिम शेख चाँद (डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल, यावल), युसूफ खान ताहेर खान (डॉ.जाकीर हुसेन ज्यु. कॉलेज, यावल), मुस्तुफा खान सुभान खान (इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूल, यावल), इक्बाल खान नसिर खान (उर्दू खासगी प्रायमरी स्कूल, यावल), अय्युब खान हमीद खान (संस्थेची बालवाडी, यावल), अताउल्ला खान सैफउल्ला खान (युनिक आयटीआय, यावल), जहिर बेग नुर बेग मिर्झा (फक्रुद्दीन अली अहेमद ज्यु.कॉलेज, वरणगाव).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.