आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:मनरेगा पारदर्शकपणे राबवून गावे विकसित करा ; चौधरी

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, नरेगा विभाग, ग्रामरोजगार सेवकांनी पारदर्शकपणे राबवून गाव, तालुका, जिल्हा व राज्याचा विकास साधावा, असे आवाहन आमदार शिरिष चौधरी यांनी केले. पंचायत समितीत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.पंचायत समिती सभागृहामध्ये ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांची मनरेगा संदर्भातील आढावा बैठक, बुधवारी दुपारी घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, काँग्रेसचे सय्यद जावेद अली, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, सहा. गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षणाधिकारी नईमोद्दीन शेख, महाराष्ट्र सरपंच परिषदेचे यावल तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, उपाध्यक्ष असंद सय्यद, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळू तायडे, राज्य संघटक खुशाल पाटील, ग्रामसेवक संघटना यावल तालुकाध्यक्ष रुबाब तडवी हे उपस्थित होते.

या बैठकीचे प्रास्ताविक सहायक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व कार्याध्यक्ष बाळू तायडे यांनी केले. बैठकीत बोलताना आमदार शिरीष चौधरी यांनी शेतकरी अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर व गावातील मजूर यांच्या वैयक्तिक कामाच्या योजना राबवाव्या. तसेच वैयक्तिक गाव विकासाच्या योजना कशा साध्य करता येतील, विविध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल. यासाठी तत्परतेने आपापले कार्य सर्वांनी केले तरच आपण खऱ्या अर्थाने विकास साध्य करू शकू असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष बाळू तायडे यांनी केले. तर आभार सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे महाराष्ट्राचे राज्य संघटक खुशाल पाटील, यावल तालुका अध्यक्ष दीपक कोळी, उपाध्यक्ष अनिल अडकमोल, वसिम पिंजारी, सचिव सरफराज तडवी, विजय सपकाळे, ईश्वर अडकमोल, कांतीलाल पाटील व तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी परिश्रम घेतले.

ग्रामरोजगार सेवकांना स्मार्ट फोनसाठी मदत जाहीर
आमदार शिरिष चौधरी यांनी यावल व रावेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना, ऑनलाइन हजेरी घेण्यासाठी लागणाऱ्या अँड्रॉइड मोबाइलसाठी वैयक्तिकरित्या आर्थिक मदत जाहीर केली. ग्रामरोजगार सेवकांना स्थानिक पातळीवर व तालुकास्तरावर येणाऱ्या अडचणी लवकरच सोडवून, समस्यांबाबत येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची ग्वाही त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...