आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल तालुक्यात ८ ग्रामपंचायतींपैकी संपूर्ण तालुक्याचे लक्ष न्हावी येथील निकालाकडे लागले होते. कारण, भाजप विरूद्ध शिवसेना (ठाकरे गट)या काट्याच्या लढतीत काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. इतरही दोन उमेदवार सरपंच पदाच्या लढतीत होते. या चौरंगी लढतीत न्हावीतील ग्रामस्थांनी शिवसेनेचे देवेंद्र चोपडे यांना सरपंचपदी विराजमान केले. सोबतच १७ पैकी ११ जागा देखील त्यांच्या पारड्यात टाकल्या. भाजपचे शरद महाजन व नितीन नारायण चौधरी यांच्या गटाचे ६ उमेदवार निवडून आले.
निवडणुकीत मतदारांनी महाजन-चौधरी यांच्या पॅनलला नाकारले. लोकनियुक्त सरपंचपदी शिवसेनेचे देवेंद्र भानुदास चोपडे हे गावाचे २१वे सरपंच ठरले. त्यांना ४८३५ मते, त्यांनी प्रतिस्पर्धी नितीन चौधरी यांचा २३५८ मतांनी पराभव केला.
याशिवाय सदस्यांमध्ये अनुक्रमे चेतन आनंदा इंगळे ५८६, नितीन चिंधू इंगळे ५७४, योगिता सचिन इंगळे ४०९, रवींद्र रमेश तायडे ३५९, प्रभाकर पंडीत कोळी ८२१, सविता गिरीश गाजरे ४२६, मयूर सुनील चौधरी ६४९, हेमांगी चेतन झोपे ३९५, आरजू सरफराज तडवी ५३०, यशवंत माधव तळेले ४६२, रूपाली विश्वनाथ तायडे ५८०, पौर्णिमा सुधाकर पाटील ६६४, शेख गफ्फार शेख याकूब पिंजारी ६९४, शेख नदीम शेख अय्युब पिंजारी १२७३, फातेमाबी रज्जाक तडवी (बिनविरोध) हे विजयी झाले. गावातील मतदारांचा कौल मान्य आहे. यापुढे देखील जनसेवा, सामाजिक कामे सुरू राहतील असे नितीन चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, संपूर्ण निकाल घोषित झाल्यानंतर गावातील विजयी सदस्य व लोकनियुक्त सरपंच समर्थकांनी एकच जल्लोष केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.