आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराम नाम जप उत्सवात भुसावळात भाविक सहभागी, ६ तास उपक्रमभुसावळ श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांनी नुकतेच सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या काळात रामनाम उत्सव शिबिराचे आयाेजन जामनेर राेडवरील नवशक्ती आर्केडच्या आवारात केले हाेते. या शिबिरात १५० पेक्षा जास्त भाविकांनी सहभाग नोंदवला होता. सुरुवातीस रामनाम जप, विश्व प्रार्थना व ब्रह्म चैतन्य परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचन होऊन शिबिरास सुरुवात झाली. या शिबिरात रामरक्षा, रामस्तुती, हनुमान चालीसा व मारुती स्तोत्र या स्तोत्रांचे सामुदायिक पठण झाले. त्यानंतर जप प्रत्येकाने दीड तास मौन राखून रामनामाचा जप केला.
१०० पेक्षा जास्त भाविकांनी जप केला. एकूण २ लाख ६० हजार इतका जप करण्यात आला. नवशक्ती आर्केडच्या आवारात आयाेजित केलेल्या या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.जे.पी. सुचिक यांनी नामाचे महत्त्व यावर प्रवचन केले. रामनामाच्या जपाचे महत्त्व यावेळी उपस्थितांना विशद केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या अध्यक्ष नूतन फालक, सचिव मनिषा पाटील, हिरामण फालक, राधेश्याम लाहोटी, राजीव शर्मा, रश्मी शर्मा, अध्यक्ष रघुनाथ सोनवणे, मालती सोनवणे, दिनकर बेंडाळे, शकुंतला भंगाळे, लता बेंडाळे, गोपाल तिवारी, सुनंदा औंधकर, जयश्री ढाके, शशीप्रभा शर्मा, जी.आर. ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी अध्यात्मिक वातावरण तयार झाले होेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.