आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधन:संगणक परिचालकांचे मानधन थकल्याने अडचणी

अंतुर्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर तालुक्यातील संगणक परिचालकांचे पगार पाच महिन्यांपासून थकीत आहेत. याबाबत संगणक परिचालकांनी गुरुवारी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.अनेक ग्रामपंचायतींमध्ये संगणक व प्रिंटर खराब झाले आहे. तसेच इंटरनेटची योग्य सुविधा नाही. त्यामुळे काम करण्यास संगणक परिचालकांना अडचणी येतात. त्यातही संगणक परिचालक तुटपुंज्या मानधनावर काम करतात. असे असूनही पगार वेळेवर मिळत नाही.

जोपर्यंत ग्रामपंचायतीकडून पं.स., तेथून जि.प. आणि जि.प.तून कंपनीकडे पैसे जात नाही तोपर्यंत मानधन मिळत नाही. आताही चार ते पाच महिन्यांचे मानधन थकीत आहे, असे माजी तालुकाध्यक्ष विलास सावकारे, मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, विजय कापसे, नितीन पाटील उपस्थित होते. ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे बीडीओंनी सांगितले. यानंतर निवेदन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...