आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील इंदिरा नगर, नगाव व लोणी सिम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आज मुंबई येथील सिम्प्रेस इंडिया कंपनीच्या सामाजिक फंडातून व डोंबिवली येथील जाणीव शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल वर्गाचे दिलीप नाना शिरूडकर व जगदीश गुजराथी यांनी उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील उपस्थित हाेते. त्यांनी ग्रामस्थांना शाळा विकासासाठी लोकसहभागाचे महत्त्व सांगितले. वृषाली पाटील यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन आजपर्यंत सुमारे २० शाळा डिजिटल केल्याचे सांगितले.
सी. एम. चौधरी यांनी बाला उपक्रमाची माहिती देवून जाणीव संस्थेला तालुक्यातील इतर ही शाळांना डिजिटल साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या वेळी अमोल शिरुडकर, दिलीप शिरुडकर, जगदीश गुजराथी, केंद्रप्रमुख भटू पाटील, लोणी सिमचे सरपंच डॉ. कैलास पाटील, उपसरपंच विलास पाटील, दामू पाटील, मगन पाटील, सुदाम पाटील, रवींद्र पाटील, मुख्याध्यापक प्रवीण पवार, मुख्याध्यापक सिद्धार्थ सरदार, अनिल पाटील, प्रवीण कोळी, नीलेश पाटील, भगवान पाटील, संजीव चव्हाण आदी हजर होते. जाणीव संस्थेचे वृषाली पाटील, तुषार शिरूडकर, वरून देवरे, गजानन सोनवणे, संपदा शिरूडकर यांचे मुख्याध्यापक रावसाहेब पाटील व कपिल शिरूडकर यांनी स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.