आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी शिबिर:उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग तपासणी; स्वाभिमानी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

अंतुर्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासन निर्णयानुसार प्रत्येक उपजिल्हा रूग्णालयांमध्ये दिव्यांग तपासणी शिबिर घ्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रत्येक उपजिल्हा रूग्णालयांमध्ये दिव्यांग तपासणी शिबिर होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे, दिव्यांग जनकल्याण संस्थेने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा केला. शासन निर्णयानुसार दिव्यांग तपासणी शिबिर हे प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात घेण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना दिव्यांग तपासणी शिबिर घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपजिल्हा रूग्णालय मुक्ताईनगर येथे शिबिर सुरू झाले. यामुळे दिव्यांगांची लांबून जळगाव येथे ये जा करताना होणारी परवड थांबेल.

बातम्या आणखी आहेत...