आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त पाणी आवक:हतनूरमधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग; टंचाईचे संकट दूर; 20 दिवसांचा साठा

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाऱ्याची पातळी खालावली होती. केवळ १० दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक होता. दरम्यान, हतनूर धरणात अतिरिक्त पाणी आवक झाल्याने तीन दिवसांपूर्वी ५० क्युसेक विसर्ग झाला. यामुळे तापीतील अपर बंधाऱ्यात ८ इंच, तर निम्न बंधाऱ्यात ६ इंचाने जलपातळी वाढली. यामुळे शहराला किमान २० दिवस पुरेल इतका जलसाठा सध्या शिल्लक आहे. परिणामी शहरातील टंचाईचे सावट निवळले आहे.

तापी नदीच्या पात्रात रेल्वे व पालिकेचा बंधाऱ्यातील जलपातळी घटली होती. यामुळे रोटेशनवर परिणाम झाला होता. मात्र, हतनूर धरणात डिसेंबर अखेरपर्यंत पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे हतनूर धरणातील पाणी पातळी २१४ मीटर ठेवण्यासाठी तीन दिवसांपूर्वी ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

हे पाणी पुढे वाहत आल्याने तापीतील अपर बंधाऱ्याची जलपातळी ८, तर निम्न बंधाऱ्यातील जलपातळी ६ इंचाने वाढली. परिणामी शहराला किमान २० दिवस पुरेल इतका साठा बंधाऱ्यात झाला. यामुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशनही ९ ऐवजी पूर्वीप्रमाणे ८ दिवसाआड होईल. तसेच बंधाऱ्यातील साठा संपण्यापूर्वी हतनूर धरणातून आवर्तन मिळून पुढील महिनाभराची सोय होईल. कारण, बंधाऱ्यातील साठा सुमारे ३२ दिवस टिकतो.

पाटबंधारे विभागाकडे आवर्तनाची मागणी केली
पालिकेने पाटबंधारे विभागाकडे आवर्तनाची मागणी केली आहे. सध्या आवर्तन मिळालेले नाही. पण, धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केल्याने निम्न बंधाऱ्याची जलपातळी वाढली. आता २० दिवस पुरेल एवढा साठा आहे. टंचाई टळली आहे.-सतीश देशमुख, पाणीपुरवठा अभियंता, पालिका

बातम्या आणखी आहेत...