आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारीनंतर टोलनाक्यावरील यंत्रणा पूर्वपदावर:सर्व्हर डाऊनमुळे मासिक पास वितरणाचा खोळंबा

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली ते तरसोद महामार्गावरील नशिराबाद टोलनाक्यावर परिसरातील वाहन धारकांना ३१५ रुपयांत मासिक पास दिली जाते. मात्र १ डिसेंबरपासून सर्व्हर डाऊनमुळे नवीन पासेस मिळणे बंद झाले होते. याबाबत वाहनधारकांनी तक्रारी करताच सोमवारी दुपारी अडचण सुटून पास वितरण पूर्ववत सुरू झाले.

नशिराबाद टोलनाक्यावर २० किलोमीटर अंतरातील वाहनधारकांना मासिक पास सवलत दिली जाते. डिसेंबर महिन्याचा पास काढण्यासाठी गेलेल्या वाहनधारकांना हा पास मिळाला नाही. १ ते ४ डिसेंबरदरम्यान सर्व्हर डाऊनमुळे पास बंद असल्याचे सांगितले गेले.

यामुळे भुसावळातून जळगावला जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी १४५ रुपये टोल वाहनधारकांना द्यावा लागत होता. या प्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्यामुळे ३१५ रुपयांच्या मासिक पास काढण्यासाठीचे सर्व्हर सोमवारी दुपारपासून सुरु झाले. याबाबत ‘दिव्य मराठी’ने महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मासिक पासची यंत्रणा सुरु आहे. वाहनधारक पास काढू शकतात, अशी माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...