आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी;:त्रस्त झालेले ठेवीदार‎ जिल्हाधिकारी;  पोलिस‎ अधीक्षकांना भेटणार‎

भुसावळ‎एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मोठ्या विश्वासाने ठेवलेल्या ठेवींची‎ रक्कम मुदत संपूनही परत मिळत नसल्याने‎ ठेवीदार वैतागले आहेत. याबाबत‎ ठेवीदारांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले‎ होते. तरीही उपयोग होत नसल्याने‎ ठेवीदारांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना‎ निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.‎ शहरातील अनेक पतसंस्था बंदच‎ आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी ठेवीच्या रकमा‎ मागायच्या कुठे? असा प्रश्न ठेवीदारांनी‎ उपस्थित केला आहे. सहकार विभागाकडे‎ देखील तक्रारी केल्यावर उपयोग होत नाही.‎

यापूर्वी काही पतसंस्थांची आर्थिक गुन्हे‎ शाखेकडून चौकशी करण्याचे आदेश‎ सहकार आयुक्त, महसूल आयुक्तांनी दिले‎ होते. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवून‎ चौधशी बंद झाली. ही चौकशी सुरू‎ करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली‎ आहे. याबाबत खान्देश ठेवीदार कृती‎ समिती जिल्हाधिकारी आणि पोलिस‎ अधीक्षकांची भेट घेणार आहे.‎