आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:गरजू विद्यार्थ्यांना मोफत‎ शैक्षणिक साहित्य वाटप‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक‎ बहुउद्देशीय फाउंडेशनतर्फे‎ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर‎ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले‎ जयंतीनिमित्ताने गरजूंना शैक्षणिक‎ साहित्य वाटप केले. अवनी दत्तक‎ योजनेतून हे साहित्य संकलित झाले‎ होते.‎ डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे‎ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन‎ करण्यात आले. प्रमुख पाहुणे‎ पोलीस निरीक्षक अनुक्रमे गजानन‎ पडघन, राहुल गायकवाड, विलास‎ शेंडे, अॅड.सुनील पगारे,‎ डी.एस.हायस्कूलचे मुख्याध्यापक‎ मोहनदास सपकाळे आदी उपस्थित‎ होते. अभिवादन स्वरुपात शैक्षणिक‎ साहित्य संकलित करून ते गरजूंना‎ वाटप करण्यात आले.‎ फाउंडेशनच्या अध्यक्ष राजेश्री‎ सुरवाडे यांनी आभार मानले.‎ यशस्वितेसाठी फाउंडेशनच्या‎ सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव‎ शैला तायडे, सुजाता सपकाळे,‎ आशा पठारे, दुर्गा सोनवणे, प्रतिमा‎ अग्रवाल यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...