आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसादाची व्यवस्था:15 हजार गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप ; माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांचा उपक्रम

भुसावळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या तब्बल १५ हजार भाविकांना यावल रोडवरील माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी साईजिवन सुपर शॉपतर्फे खिचडी, पुरीभाजी, केळी व फराळ वितरण केले. सकाळी ११ वाजेपासून रात्री ९.३० वाजेपर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.शहरातील यावल रोडवरुन तापी नदीकडे बाप्पाच्या विसर्जनासाठी जाणाऱ्या व विसर्जन करुन घरी येणाऱ्या भाविकांसाठी साईजीवन सुपर शॉपजवळ माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती.

सकाळी ११ वाजेपासून महाप्रसाद वितरण सुरु झाले. गरमागरम खिचडी, पुरीभाजी, केळी आदी प्रसाद वितरण झाले. त्यासाठी ५०० किलो बटाटे, ६०० किलो गव्हाचे पीठ, १५ तेलाचे डबे, १३०० किलो तांदूळ, मसाले आदींचा वापर करण्यात आला. १० हजार केळीचे वितरण, तर पिण्यासाठी २५० पाण्याचे जार वापरले गेले. साईजिवनचे सर्व कर्मचारी, निर्मल कोठारी मित्र परिवार, शहरातील अनेक भाविकांनी सेवाकार्य केले. विसर्जन मार्गावरील सर्व भाविकांना पिण्यासाठी थंडगार मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आली होती.साईजिवनचे सर्व कर्मचारी, निर्मल कोठारी मित्र परिवार, शहरातील अनेक भाविकांनी सेवाकार्य केले. विसर्जन मार्गावरील सर्व भाविकांना पिण्यासाठी थंडगार मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...