आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे केले वितरण; चिनावल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चिनावल12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल ८ जून रोजी जाहीर झालेला होता. त्या परीक्षेच्या गुणपत्रिका १७ रोजी प्राप्त झाल्या. बारावीच्या परीक्षेमध्ये विद्यालयातून विज्ञान व कला शाखेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेचे चेअरमन यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी व परिश्रमाशिवाय पर्याय नाही असा सल्ला दिला. यावेळी संस्थेचे चेअरमन किशोर बोरोले, मुख्याध्यापक एच.आर.ठाकरे, उपमुख्याध्यापिका मिनल नेमाडे, पर्यवेक्षक पी.एम.जावळे तसेच उच्च माध्यमिक विभागाचे ईश्वर नेमाडे, एस.आर.भालेराव, चंद्रकांत भारंबे, केदार धांडे, नीलिमा चौधरी, मनिषा फेगडे, पंकज वानखेडे, योगेश नेमाडे, प्रभाकर इंगळे तसेच गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत नाफडे यांनी केले. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसह युपीएससीचा मानस व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...