आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री‎ शिक्षण:सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वही,‎ साडी, प्रमाणपत्रांचे वरणगावात वाटप‎

वरणगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव‎ येथील पाेलिस ठाण्यात स्त्री‎ शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्याेती‎ सावित्रीबाई फुले यांच्या‎ जयंतीनिमित्त सिद्धेश्वर नगर पोलिस‎ पंचायत महिला दक्षता समिती,‎ अखिल भारतीय ग्राहक पंचायत व‎ महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप यांनी‎ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन‎ केले होते.

आयोजक सविता माळी‎ कार्यक्रमाच्या अध्यक्ष हाेत्या.‎ कार्यक्रमास उद्घाटक म्हणून‎ येथील पाेलिस ठाण्याचे सहाय्यक‎ पाेलिस निरीक्षक आशिष कुमार‎ अडसुळे तर प्रमुख म्हणून चंद्रकांत‎ हरी बढे, दूध फेडरेशनच्या‎ संचालिका शामल झांबरे,‎ राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र‎ चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनील‎ काळे, रवी नारखेडे, रफिक खान,‎ मिलिंद भैसे, सिटी पोलिस‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ठाण्याच्या कौन्सिलर भारती म्हस्के,‎ राष्ट्रवादीच्या उपजिल्हाध्यक्ष प्रतिभा‎ तावडे, यावल दक्षता समितीच्या‎ सदस्य द्वारका पाटील, प्रा.संध्या‎ निकम, गंगाधर सांडू चौधरी‎ विद्यालयाच्या प्रा.रजनी झांबरे,‎ जर्जिस फाउंडेशनच्या अध्यक्ष‎ शबनाबी खान, निरंजना तायडे,‎ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गायकवाड उपस्थित हाेत्या.‎ कार्यक्रमामध्ये ५० विद्यार्थ्यांना वही‎ वाटप, ३० विधवा व अपंग महिलांना‎ साडी वाटप तसेच जिल्हा उद्योग‎ केंद्रामार्फत एक महिना काॅम्प्युटर‎ प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना‎ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती‎ गुरव यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...