आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाजळी:रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी, बाजारात येणार 18 कोटी; दहा हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 17,951 रु. बोनस

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही जल्लोषात होणार आहे. कारण, त्यांना दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी १७ हजार ९५१ रुपये मिळाले आहेत. भुसावळ रेल्वे विभागातील तब्बल १४ हजार ७१० कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर सोमवारी (दि.३) ही रक्कम जमा करण्यात आली. दरम्यान, भुसावळ शहरात रेल्वेचे किमान ८ हजार, तर जिल्ह्यात १० हजार रेल्वे कर्मचारी आहेत. जिल्ह्यातील १० हजार कर्मचाऱ्यांना मिळालेल्या १८ कोटी रुपये बोनस रकमेतून बाजारात खऱ्या अर्थाने ‘खरेदीची दिवाळी’ साजरी होईल. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, कपडे, वाहन, दागिन्यांची खरेदी वाढेल.

रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी दिवाळी बोनस देण्याचा निर्णय झाला होता. यानुसार जिल्ह्यातील १० हजार ७१० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १७ हजार ९५१ रुपये म्हणजे १८ कोटी रुपये बोनस दिला गेला आहे. सोमवारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली. भुसावळ रेल्वे विभागातील १४ हजार ७१० कर्मचाऱ्यांपैकी ८ हजार कर्मचारी भुसावळ शहरातील आहेत. बोनस मिळाल्याने उलाढाल व बाजारपेठेत खरेदी वाढेल. बोनसच्या रक्कमेतून सोने-चांदी, मोबाइल, रेडिमेड कपडे व अन्य वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण वाढेल.

७८ दिवसांचा बोनस
प्रॉडक्शन लिंक्ड बोनस किंवा पीएलबी देण्‍यासाठी विहित केलेली मजुरी गणना मर्यादा ७ हजार रुपये प्रति महिना आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला ७८ दिवसांसाठी देय असलेली कमाल रक्कम १७ हजार ९५१ रुपये दिली गेली.

अर्थकारणाला चालना
जळगाव जिल्ह्यात सुमारे १० हजार रेल्वे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या एकत्रित बोनसची रक्कम सुमारे १८ कोटी रुपये आहे. त्यामुळे बोनसच्या माध्यमातून १८ कोटींची गंगाजळी जिल्ह्यात येणार असून, या माध्यमातून अर्थकारणाला चालना मिळेल.

बातम्या आणखी आहेत...