आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशालेय जीवनात मिळालेल्या किंचित यशाने हुरळून जावू नका. ध्येय दूरस्थ ठेवून ते जिद्दीने गाठा. आयुष्यात ईच्छा, महत्वाकांक्षा, ध्यास या तीन गाेष्टींकडे लक्ष द्या. अशक्य गाेष्ट शक्य करायची असेल तर त्यासाठी अथक परिश्रमाची तयारी ठेवा, असा सल्ला तज्ञ मार्गदर्शकांनी भुसावळ येथील आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना दिला. चैतन्य चिरंतन बक्षीस वितरण, शालेय वार्षिक पारिताेषिक वितरण साेहळा विद्यालयात पार पडला. त्यात तज्ञांनी मार्गदर्शन केले. अप्पर जिल्हा काेषागार अधिकारी सुभाष गुंजाळ, डाॅ. गणेश व्ही. पाटील यांच्या हस्ते गुणवंतांचा गाैरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन ए. एन. शुक्ल होते. प्रमुख पाहुणे सातपुडा शिक्षण संस्थेचे जाॅइंट सेक्रेटरी व्ही. एम. महाजन, संचालक जे. एच. चौधरी, उपाध्यक्ष हेमंत चौधरी, प्राथमिक शाळेचे भुसावळच्या झांबरे विद्यालयात भारत विकास परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या समूहगान स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल चेतना पाटील व ग्रुपचा सत्कार करताना डॉ. गणेश पाटील.
चेअरमन संजय पाटील, संचालक सागर चौधरी, पी. ए. शुक्ल, एस. आर. झांबरे, प्रकाश झांबरे, दीपक चौधरी, गिरीश पाटील, जयश्री चौधरी उपस्थित होते. चैतन्य चिरंतन बक्षीस योजनेतील बक्षीस वितरण स्वर्गीय डॉ. यशोदाबाई लक्ष्मण चौधरी यांच्या दान ठेवीवरील व्याजाच्या रकमेतून झाले. मुख्याध्यापक एस. बी. कुमावत, पर्यवेक्षक एस. डी. यांच्यासह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन मनिष गुरचळ यांनी केले.
बक्षिसातून प्रेरणा मिळते भुसावळ हायस्कूलचा मी माजी विद्यार्थी. शाळेत असाच खाली बसायचो व याच ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी यायचो. पारिताेषिक वितरण साेहळा हा विद्यार्थी जीवनातला एक टर्निंग पाॅइंट असताे. यशाचा हा काैतुक साेहळाच म्हणावा लागेल. विद्यार्थी हे शिक्षणसंस्थेचे वैभव असते हा विचार या शैक्षणिक संकुलात पाय ठेवल्यावर सदाेदीत येताे, असे भावाेद्गार डाॅ. गणेश पाटील यांनी आवर्जून काढले.
Share with facebook बक्षिसातून प्रेरणा मिळते भुसावळ हायस्कूलचा मी माजी विद्यार्थी. शाळेत असाच खाली बसायचो व याच ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी यायचो. पारिताेषिक वितरण साेहळा हा विद्यार्थी जीवनातला एक टर्निंग पाॅइंट असताे. यशाचा हा काैतुक साेहळाच म्हणावा लागेल. विद्यार्थी हे शिक्षणसंस्थेचे वैभव असते हा विचार या शैक्षणिक संकुलात पाय ठेवल्यावर सदाेदीत येताे, असे भावाेद्गार डाॅ. गणेश पाटील यांनी आवर्जून काढले.
सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने समाज बांधवांच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यामध्ये समाजातील मुला मुलींचे तसेच पुरुष व महिला भाविकांचे लेझीम पथक भुसावळ शहरवासीयांसाठी आकर्षण ठरले. भगवे फेटे आणि पांढरा कुर्ता अशा पेहरावात लेझीम पथकाने लक्ष वेधले. टाळकरी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा देखावा देखील मंडळातर्फे सादर करण्यात आला होता. मिरवणुकीनंतर नृत्य स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण झाले. नृत्य स्पर्धेचे आयोजन योगेश उबाळे यांनी केले. माजी नगराध्यक्ष तथा जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेवक परीक्षित बऱ्हाटे, दीपक धांडे उपस्थित होते.
ध्येय ठरवून झेप घ्या
ध्येय निश्चित करताना मनात गाेंधळ ठेवू नका. शांत डाेक्याने ते ठरवायला हवे. जिद्द, चिकाटी अाणि मेहनत घेण्याची तयारी असली तर यश हमखास मिळते. गरज आहे ती स्वत:च्या मनावर दृढ विश्वास ठेवण्याची. ज्यांना बक्षिसे मिळाली त्यांनी आणि ज्यांना नाही मिळाली त्यांनीही झपाटून अभ्यास करावा. यशाेशिखर आपल्याला खुणावते आहे हे लक्षात ठेवावे, असा सल्ला गुंजाळ यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.