आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँकेने कारखाना विक्रीचा घाट घातल्याने कारखाना परिसरातील जनतेत असंतोषाचे वातावरण असून बँकेचे हे धोरण शेतकरी, कामगार व मजूर यांच्या दृष्टीने योग्य नाही. या लोकांचे भवितव्य लक्षात घेऊन कारखाना विक्री न करता तो भाडे तत्वावर द्यावा, अशा आशयाचे निवेदन बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना मधुकर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील व संचालक मंडळाने दिले आहे.
कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेण्यापूर्वी वेळोवेळी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाशी झालेल्या चर्चेनुसार जिल्हा बँक कारखाना ताब्यात घेऊन २५ वर्षे भाड्याने देण्याची भूमिका घेतली. परंतु बँकेच्या संचालक मंडळाच्या १३ जून रोजी झालेल्या सभेत कारखाना विक्री करून टाकायचा, असा विषय झाला होता. बँकेचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांची कारखान्याचे चेअरमन यांच्याशी सभेच्या दुसऱ्या दिवशी संभाषण झाले की, कारखाना भाडे तत्वावर देण्याचा विषय रद्द करून कारखाना विक्री करण्याचा विषय घेण्यात आला आहे.
येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त झाले असून, कारखान्यावर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. आर्थिक अडचणीमुळे निवडणूक निधी पूर्ण न भरल्यामुळे कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक सहसंचालक ( साखर) औरंगाबाद यांनी १३ जून रोजी दिलेल्या आदेशान्वये मधुकर साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून, जळगावचे सहाय्यक निबंधक व्ही.एम.गवळी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हा आदेश १७ जून रोजी कारखान्यास प्राप्त झाला आहे. या आदेशामुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता प्रशासक बसल्याने ते कारभार पाहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.